मुंबई : बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सपनाला अटक होईल, इतका मोठा गुन्हा नेमका तिने काय केलाय, ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपना चौधरी  (Sapna Choudhary) विरोधातील एका प्रकरणात सोमवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीला सपना चौधरी गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना लखनौच्या ACJM कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. चार वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयात हे वॉरंट जारी केले आहे. 


प्रकरण काय? 
सपनाविरुद्धचा  (Sapna Choudhary) हा खटला 2018 सालचा आहे. 13 ऑक्टोबर 2018 रोजी सपना चौधरीविरुद्ध आशियाना पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती.लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा नृत्याचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी हजारो तिकीटांचीही विक्री करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सपना चौधरीलाही  (Sapna Choudhary) आगाऊ रक्कम देण्यात आली होती पण सिंगर कार्यक्रमाला हजर राहिली नाही. त्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला होता. दरम्यान या कार्यक्रमासाठी सपनाने घेतलेले पैसेही आयोजकांना परत केले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. 


दरम्यान याआधी न्यायालयाने सपना चौधरीच्या  (Sapna Choudhary) अंतरिम जामिनाला मुदतवाढ दिली होती. न्यायालयाने प्रत्येकी 20,000 रुपयांच्या दोन जामीनावर आणि त्याच रकमेच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. सुत्रानुसार, सोमवारी गायिका सपना चौधरीचा माफीचा अर्जही न्यायालयात देण्यात आला नाही, तर अन्य आरोपींच्या वतीने माफीचा अर्ज देण्यात आला होता. या सुनावणीला सपना न्यायालयात गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात आता तिला अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.