मुंबई : डान्सिंग क्वीन सपना चौधरी सध्या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. अलीकडेच, सपनाशी संबंधित एक बातमी समोर आली होती. ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत होते.  तब्येत बिघडल्यामुळे, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तिच्याशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. ही माहिती स्वत: अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली होती. हा व्हिडीओ पाहून सपनाचे चाहते चांगलेच घाबरले होते. मात्र, आता सपना पूर्णपणे व्यवस्थित आहे. नुकतीच तिने आपण बरी असल्याचीही बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली. सपनाच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. 


सपना चौधरीची तब्येत चांगली झाल्या-झाल्या तिने नवीन डान्स व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तिने ब्राऊन कलरचा टॉप आणि स्कर्ट परिधान केल्याचा दिसत आहे. याचबरोबर सपनाने ब्राऊन रंगाचे बूट कॅरी केले आहेत. देसी क्वीनच्या या स्टायलिश स्टाईलची चाहत्यांना खात्री पटली आहे. व्हिडिओमध्ये सपना चौधरी नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. सपनाने कोणत्याही प्रकारचे दागिने देखील घातले नाहीत. सपनाचा हा लूक पाहून ती स्वीट एन्ड सिंपल दिसत असल्याचं आपण म्हणू शकतो.  सपना चौधरीच्या स्टाईलिश आणि साध्या शैलीचं हे मिश्रण खूपच कूल आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 सपना चौधरी तिच्या स्टायलिश स्टाईलसाठी ओळखली जाते. सपनाच्या चाहत्यांना तिची प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची पद्धत आवडते. यामुळेच सपनाला सोशल मीडियावर लाखो लोक पसंत करतात. आणि फक्त फॉलोच नाही तर तिच्या प्रत्येक फोटोवर आणि व्हिडिओवर प्रेमाचा वर्षावही करतात.