मुंबई :  डान्स म्हटलं की, सपना चौधरी हे नाव प्रत्येकाच्या मनात अगदी सहज येतं. लोक तिला देसी क्वीन, डान्सिंग क्वीन म्हणून ओळखतात. मात्र जरी बाहेरून सगळंकाही चांगलं दिसत असलं, तरी सपनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर, ती अजूनही मनोरंजन विश्वात संघर्ष करत आहे. सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकांउन्टवर तिचं नवं गाणं 'गुर्शल'चा एक टिझर शेअर केला आहे. या टिझरला युजरर्स पसंती दर्शवत आहेत. सपना चौधरीच्या म्हणण्यानुसार हे गाणं खूप वेगळं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे गाणं एका लहान मुलाच्या जीवनावर आधारित आहे. या गाण्यात सपनाचा लूक देखील एमदम वेगळा दाखवण्यात आला आहे. या गाण्यात सपनाने हरियाणवी ड्रेस परिधान केला आहे. जो हिरयाणामधील खेडे गावातील महिला परिधान करतात. त्याच बरोबर या गाण्यात सपना वयस्कर दिसत आहे. सपनाचा हा लूक पाहून चाहते आश्यर्यचकित होत आहेत. याचबरोबर गाण्यात एक संदेश देण्यात आला आहे. हे गाणं 20 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



डान्स हे पहिलं प्रेम आहे
एका मुलाखतीत सपना म्हणाली होती की, 'मी आज जे काही आहे ते माझ्या डान्स शोमुळे आहे. डान्स माझं पहिलं प्रेम आहे आणि असेल. असं नाही की मी माझी डान्सची आवड संपली आहे. परंतु मला इतर गोष्टी देखील एक्सप्लोर करायच्या आहेत. मला आशा आहे की, मला लवकरच काहीतरी काम मिळेल. सपना 'बिग बॉस 11'चा भाग होती आणि ती म्हणाली की, ''रिअॅलिटी शो केल्यानंतर तिच्या आयुष्यात काही खास बदललेलं नाही. 'लोकांना वाटतं की, शो केल्यानंतर स्पर्धक मोठे सेलिब्रिटी बनतात. पण तसं काहीच नाही''.