मुंबई :  सपना चौधरीचे नाव नेहमीच चर्चेत असते. तिच्या दमदार डान्सने ती सगळ्यांचं लक्षवेधून घेते. सपना तिच्या नृत्यासोबतच गायन आणि अभिनयासाठीही प्रसिद्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर केवळ 10 दिवसांनी सपना स्टेज शोसाठी पोहोचली.


सपनाने होळीच्या मुहूर्तावर स्टेज शोमध्ये परफॉर्म केला आणि दाखवून दिले आहे की तिच्या कामाचा आदर करणारं क्वचितच कोणी असेल.


सपना चौधरीने नुकताच तिच्या स्टेज शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगताना दिसत आहे.


सपना चौधरीनेही तिचा नवीन व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सपना व्हिडिओमध्ये म्हणते की, पोटाची शस्त्रक्रिया झाली आहे आणि शस्त्रक्रियेला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नाहीत.


तिच्या पोटावर टाके पडले होते, जे दोनच दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. ती पोटावर जास्त दाब देऊ शकत नाही.


पुढे सपना चौधरी सांगते, ती कार्यक्रमाला गेली नसती तर आयोजकांना त्रास झाला असता, तिने परफॉर्म केलं नसतं तर तेथे आलेल्या लोकांना वाईट वाटलं असतं.


सपना हसते आणि म्हणते, ती आली नसती तर नंतर त्याच संयोजकाने तिच्यावर केस दाखल केली असती आणि मॅडम फसवणूक आहे असे सांगितले असते. माहित नाही काय काय झालं नसतं."


काही महिन्यांपूर्वी सपना चौधरीने एका कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला होता आणि त्यानंतर ती या ठिकाणी पोहोचली नव्हती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यामुळे लोक संतापले होते आणि आयोजकांनी सपना विरोध तक्रार दाखल केली होती. त्यामुळे यावेळी सर्जरी झालेली असतानाही सपना कार्यक्रमात पोहोचली.


याआधी सपना शोमध्ये परफॉर्म का करते असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यामुळे मी पोटासाठी नाचते असं तिने सांगितलं होतं, ज्याची खूप चर्चा झाली होती. तिने एका मुलाखतीत असं म्हटल्याचं बोललं जातं होतं.