Sapna Choudhary's Mother on her cannes 2023 debut : लोकप्रिय हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीनं नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. सपनाच्या पहिल्या लूकनंतर तिचा दुसरा लूक चर्चेत आला होता. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सपनानं डेब्यू केला आहे. सपनानं पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट फेदर ड्रेसमध्ये सपना सुंदर दिसत होती. त्यावेळी तिनं मॅचिंग हील्स आणि पोनीटेलमध्ये तिचा लूक उठून दिसत आहे. यानंतर सपनानं आणखी एक सुंदर ड्रेस परिधान केला होता. खरं सांगायचं झालं तर सपना ही पहिली रीजनल आर्टिस्ट आहे जी कान्सला पोहोचली आहे.  तर ती कान्सला पोहोचण्याचं कारण म्हणजे तिचं आणि एअरफ्रान्सचं कोलॅबरेशन आहे. सपना कान्सला पोहचल्यानंतर तिची आई खूप भावूक झाली आणि त्यासोबत इमोशनल झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपनानं तिच्या या प्रवासा विषयी एका मुलाखतीत सांगितलं आहे. सपनाला या मुलाखतीत विचारले की तिच्या घरच्यांनी तिला कान्समध्ये येण्याआधी काय सल्ले दिले? त्यावर ती म्हणाली, 'माझी आई काल पासून 5 ते 6 वेळा रडली आहे. पुढे सपना म्हणाली की तिला कान्समध्ये ती जशी आहे तसंच दाखवायचं आहे. तिला कोणताही दिखावा करायचा नाही. तिला जसं वाटेल तसं ती करेल.'



पुढे ती कान्सला जाणाय ही बातमी इतरांना सांगितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी होती याविषयी सांगताना सपना म्हणाली, 'अर्धा लोकांना विश्वास होत नव्हता की मी कान्सला जाणार आहे. त्यांना वाटलं मी खोटं बोलते. जेव्हा ती घरातून कान्सला यायला निघाली तेव्हा तिला वाटलं की हे खूप कठीण असेल पण ते खूप सोप होतं. कान्सला येण्यासाठी ती नर्वस नव्हती.' 


हेही वाचा : जन्मत:च अभिनेत्रीच्या आई- वडिलांनी तिचं तोंडही पाहिलं नव्हतं... आजही ते कटू क्षण आठवून 'ती' ढासळते



सपना पुढे म्हणाली, 'ती गेल्या तीन महिन्यांपासून कान्ससाठी तयारी करत होती. तिनं डायटिंग केली आणि वर्कआऊट देखील केलं. तिला वाटलं जेव्हा कान्सला जाणार तेव्हा तिला खूप चांगल जेवण मिळेल. पण तिथे गेल्यानंतर तिला काहीच मिळालं नाही. सपनानं कान्समध्ये 30 किलोचा लेहेंगा परिधान करत डेब्यू केला होता. सपनानं परिधान केलेल्या या ड्रेसवर फुलांची नक्षी होती आणि त्यासोबत गुलाबी रंगाचे स्टोन देखील होते. त्यावेळी तिनं मॅचिंग ज्वेलरी, नॉर्मल मेकअप आणि स्लीक हाय बननं तिचा लूक पूर्ण केला.'