सपना चौधरीची लाखोंची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल
सध्या सपना एका अडचणीत अडकली आहे. सपनाला एका आयोजकाकडून फसवण्यात आले आहे.
मुंबई : अभिनेत्री सपना चौधरी ही नेहमीच तिच्या नृत्याने, नखऱ्याने ओळखली जाते. तिने केलेले नृत्य आणि अभिनय सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरतात. तिच्या टिक-टॉक व्हिडिओमुळे ती कायम चर्चेत असते. हरियाणातील डान्सर सपना चौधरी आधीपासून प्रसिद्ध होतीच. पण बिग बॉसमधील प्रवेशानंतर तिच्या प्रसिद्धीमध्ये कमालीची वाढ झाली. सध्या सपना एका अडचणीत अडकली आहे. सपनाला एका आयोजकाकडून फसवण्यात आले आहे. सपनाचा भाऊ विकास चौधरीने एका कार्यक्रमाच्या आयोजकावर फसवणूकीचा आरोप केला. भाऊ विकासने याप्रकरणाची महिती माध्यमांना दिली होती.
तर ही फसवणूक एका शोमध्ये पूर्ण पेमेंट न केल्याने झाली आहे. आयोजकांनी कार्यक्रमाचे मानधन 8 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते पण आयोजकांनी पूर्ण 8 लाख रुपये न देता फक्त 6 लाख रुपये दिल्यामुळे सपना आणि भाऊ विकासने आयोजकांवर फसवणूकीचा दावा ठोकला आहे.
लुधियानामध्ये झालेल्या एका कार्यक्रमाची पूर्ण रक्कम सपना पुलवामामध्ये शहीद झालेल्या कुटुंबाला मदत म्हणून देणार होती. विकास चौधरीने आयोजकांविरूद्ध पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणांचा तपास सुरू केला असून सीसीटीव्हि फुटेजच्या मदतीने आयोजकांचा शोध घेण्यात येणार आहे.