Sara Ali Khan Birthday Celebration : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा आज वाढदिवस आहे. सारा अली खान आज 28 वर्षांची झाली आहे. वाढदिवस असल्यानं सगळ्यांप्रमाणेच साराचा देखील घरच्या घरी आधी वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो सारानं देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मित्र-मैत्रिणींच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. रात्री 12 वाजता साराचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत सारा केकवर असलेल्या स्पार्कलिंग कॅन्डल्सला घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. तर सारानं तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत हा केक कापला आहे. सारा घाबरल्याचा व्हिडीओ शेअर करत तिच्या मैत्रिणींनं कॅप्शन दिलं की ही मुलगी कोणालाच घाबरत नाही फक्त तिच्या बर्थ डे केकला सोडलं तर. साराच्या बर्थ डे सेलिबेशनचे फोटो आणि व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 



साराला तिच्या वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. साराची सावत्र आई करीना कपूर खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर केली आहे. यात करीनानं साराचा तिचे वडील सैफ अली खान आणि जेहसोबतचे असे एक-एक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत 'बर्थडे बेब... सुंदरी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, येणारं वर्ष तुझ्यासाठी खूप आनंदाचं जाओ', असे कॅप्शन तिनं दिलं आहे. या फोटोला रिशेअर करत सारानं 'धन्यवाद के' असे कॅप्शन दिलं दिले आहे.



 


हेही वाचा : Jailer Box Office Collection Day 2: रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!


अभिनेत्री अनन्या पांडेनं सोशल मीडियावर त्या दोघींचा एक जूना फोटो शेअर करत साराला शुभेच्छा दिल्या आहेत. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर. तुझ्यासोबत कसं असतं माहितीये. तू जे पाहते ते तुला मिळतं. तू हे असचं नेहमीच बोलतेस. ही तुझ्यात असलेली माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. अशीच मॅड रहा सारा. खूप खूप प्रेम.' अभिनेत्री राधिका मदाननं देखील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या दोघी कुठे फिरायला गेल्याचे दिसत आहेत. एका मोठ्या दगडावर बसल्याचे आपण पाहू शकतो. राधिकानं हा फोटो शेअर करत 'मिस हटके वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा', असं कॅप्शन दिलं आहे.