मुंबई : सारा अली खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खानचे आज असंख्य चाहते आहेत. अभिनयाप्रमाणेच सारा तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते. सारा सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण धवन आणि नताशा दलाल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जाते. आहे. नताशाने 24 जानेवारीला लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या जोडप्याने एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. या पार्टीत सारा अली खानही पोहोचली होती, मात्र यादरम्यान तिच्या नाकाला दुखापत झाल्याचं दिसून आलं.


सारा अली खानच्या नाकाला दुखापत
सारा अली खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसलेली दिसत आहे. पारंपारिक लूकमध्ये सारा खूपच क्यूट दिसत आहे, परंतु यादरम्यान तिच्या नाकाला झालेल्या दुखापतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  


सारा अली खानचा व्हिडिओ
सारा अली खान कारमधून खाली उतरते आणि नंतर पापाराझींसमोर उभी राहून फोटो क्लिक करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर ती बिल्डिंगमध्ये जाते. यावेळी सारा अली खान निळ्या आणि गुलाबी रंगाच्या शरारा ड्रेसमध्ये दिसली. कानातले, बांगड्या आणि हलका मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला. व्हिडिओमध्ये सारा अली खानच्या नाकाला झालेली जखमही पाहायला मिळत आहे.


सारा अली खानचं वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सारा अली खान शेवटची अतरंगी रे या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने अक्षय कुमार आणि साउथ स्टार धनुषसोबत काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी साराच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये ती एका स्वातंत्र्य सैनिकाच्या लूकमध्ये दिसली होती. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prive Video वर स्ट्रीम केला जाईल. याशिवाय साराकडे लक्ष्मण उतेकर यांचाही चित्रपट आहे ज्याचं टायटल अद्याप प्रदर्शित झालेलं नाही. या चित्रपटात सारासोबत विकी कौशलही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती वीर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दुसरीकडे शुभमन गिल हा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत होता. सारा शेवटची आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' मध्ये दिसली होती.