Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात तिचा अभिनय पाहून अनेकांना आश्चर्य झाले. तर तिचा अभिनय अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतीच सारा व्होग कव्हर पेजवर दिसली आहे. तिचे हे कव्हर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेहमीच तिच्या लूक्समुळे चर्चेत असणारी सारा आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. साराला तर अनेकांनी त्यावरून ट्रोलही केलंय. दरम्यान, सध्या सारानं तिच्या धार्मिक श्रद्धेबद्दल किंवा मग ती ज्याप्रकारे सगळ्या धर्मांचा सन्मान करते यावरून ट्रोल होण्यावर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतरांना काय वाटतं त्यानं तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही यावर सारानं व्होगला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. "कोणत्याही बाह्य घटकापासून मी विचलीत होता कामा नये किंवा अगदी मी कशी दिसते यासाठी मी इतरांच्या मतांवर अवलंबून राहता कामा नये हे मी शिकले आहे. त्यामुळेच मी स्वत:मधील गुणांचा विचार करतच लहानाची मोठी झाले. हे गुण माझ्यात फार आतपर्यंत रुझलेले आहेत. खास गोष्ट म्हणजे हे गुण इतक्या सुरक्षित पद्धतीने माझ्या स्वभावात, वागण्यात, बोलण्यात रुझले आहेत की मला आता इतर लोकांच्या मतांचा फारसा फरक नाही," असं सारा म्हणाली. यामधून तिने तिच्यावर होणाऱ्या टिकेकडे तसेच तिच्याविषयी काय बोललं जातं याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते हे सांगण्याचा प्रयत्न केला.



पुढे सारा म्हणाली, "माझ्या हृदयात मी अजूनही तिच मुलगी आहे जी कोलंबियात रशियाचा इतिहास शिकायला गेली होती. मला वाटतं की स्वत: विषयी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहित असनं गरजेच आहे कारण लोक माझ्याविषयी काय विचार करतात हा विचार न करताच मी आयुष्यात पुढे जाऊ शकते."


हेही वाचा : VIDEO : मंजीरीचं 'हे' वाक्य ऐकल्यावर का पळून गेला प्रसाद ओक!


तिच्या कामाबद्दल झालेल्या टीकेबद्दल बोलताना सारा म्हणाली, "ती प्रेक्षकांसाठी काम करते आणि त्यांना तिचं काम आवडतं की नाही हे तिला जाणून घ्यायचं असते. इतकंच नाही तर तिला प्रेक्षकांसाठी उत्तोमत्त काम करायचं असतं. पण त्याच जागेवर ते जर तिच्या पर्सनल गोष्टींवर बोलत असतील उदा. तिच्या धार्मिक श्रद्धेबद्दल, तिच्या कपड्यांबद्दल आणि तिच्या एअरपोर्टवरील हेअर स्टाईलवर कोणाच्या कोणत्याही विचारावर किंवा प्रतिक्रियेचा तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही." 


दरम्यान, सारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा व्होगचा कव्हर फोटो शेअर केला आहे. साराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.