मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती तिच्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. साराचे सुंदर फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, परंतु अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो थोडा घाबरवणारा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये सारा एका अपघाताची शिकार होताना दिसत आहे. सुदैवाने तिला जास्त दुखापत झाली नसली तरी या अपघाताचा व्हिडिओ साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. याशिवाय हा व्हिडीओ तिच्या फॅन पेजवरही शेअर करण्यात आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे.


व्हिडिओमध्ये सारा मेकअप रूममध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी तिने पिंक कलरची हुडी परिधान केली आहे. एक मेकअप आर्टिस्ट साराच्या चेहऱ्यावर टच-अप करत आहे जेव्हा अभिनेत्री तिला सांगते की 'जीतू से कह दो नारळ पाणी ला दे' म्हटल्यावर, सारा तिचा मेकअप आरशात पाहू लागते आणि तिचा मेकअप आर्टिस्टही निघून जातो.


मग खूप मोठा सायरनचा आवाज येतो आणि अचानक लाइट बल्बचा स्फोट होतो. ज्यामुळे सारा अली खान घाबरते. यानंतर साराचा व्हिडिओ थांबतो. तिच्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करताना, अभिनेत्रीने बल्ब इमोजी देखील शेअर केला आहे याचबरोबर 'सकाळी असं काहीतरी' अशा आशयाचं कॅप्शन तिने या व्हिडिओसोबत शए्र केलं आहे. 



आजकाल सारा तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग विकी कौशलसोबत करत आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. अलीकडेच सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी' रेमध्ये दिसली होती.