`महिलांना पार्टनरकडून काय हवं असतं...`, Sara Ali Khan कडून मोठा खुसाला
तुम्ही आजही पार्टनरकडून काय हवय सांगायला लाजता? वाचा सारा अली खान काय म्हणते...
मुंबई : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) कायम तिच्या अभिनयामुळे आणि स्वभावामुळे चर्चेत असते. 'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या साराने कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 'केदारनाथ' सिनेमानंतर साराने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सारा अली खान फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. (Sara Ali Khan on What Women Want)
काही दिवसांपूर्वी सारा अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) च्या What Women Want शोमध्ये पोहोचली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल करीनासोबत गप्पा मारल्या. एवढंच नाही तर, महिलांना त्यांच्या पार्टनरकडून काय हवं आहे? याबद्दल देखील सांगितलं आहे.
सारा म्हणाली, '20 वर्षांपूर्वी महिला त्यांच्या पार्टनरकडून त्यांना काय हवय किंवा त्यांना काय वाटतं हे सांगण्यासाठी लाजायच्या. पण आता तसं नाहीये. आता महिला मोकळेपणाने बोलतात. त्यांना पार्टनरकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे.' (sara ali khan and kareena kapoor age gap)
पुढे सारा म्हणाली, 'महिलांमध्ये आता तो आत्मविश्वास आला आहे. कदाचित त्या आता स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे त्या बोलू शकतात' असं मत साराने यावेळी व्यक्त केलं.