मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan ) आपल्या कुटुंबाशी किती कनेक्ट आहे हे आपण अनेकदा पाहिलं आहे. साराचं सावत्र आई करीना कपूर (Kareena Kapoor) सोबत देखील अतिशय चांगल नातं आहे. एवढंच नव्हे तर ती आपल्या वडिलांसोबत म्हणजे सैफ अली खान (Saif Ali Khan) किती जवळ आहे हे पाहायला मिळेल. 


वडिल सैफ यांच्यासाठी जाहिर केलं प्रेम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साराने आपले वडिल सैफ यांच्याबद्दल प्रेम जाहीर करण्याची अनोखी पद्धम समोर आणली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये ती एका चहा स्टॉलबाहेर बसलेली दिसत आहे. या चहा स्टॉलचं नाव 'सैफ चहा वाला' असं आहे. 



या फोटोत सारा एथनिक लूकमध्ये पोझ देताना दिसत आहे. साराने सफेद रंगाचं सूट घातलं आहे. सोबतच कपाळावर टिकली लावून तिने अतिशय सुंदर पोझ दिली आहे. आणि हा फोटो शेअर करताना 'आय लव माय डॅड' म्हटलं आहे. 


 सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह (Amrita Singh) यांची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) खूप चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सारा आपल्या आईच्या अगदी जवळ आहे. सारा लहान असल्यापासूनच अमृता सिंह तिची जास्त काळजी घेते. अमृताने सैफशी लग्न केलं तेव्हा तो अवघ्या 20 वर्षांचा होता. एका मुलाखती दरम्यान अमृताने साराबाबत महत्वाचा खुलासा केला होता. 


अमृता आणि सैफ काही वर्षांपूर्वी सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये गेले होते. त्यावेळी सिमी यांनी अमृताला एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की, जर तुमच्या मुलीने देखील कमी वयात लग्न केलं तर? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अमृताने उत्तर दिलं होतं की,'मी माझ्या मुलीला फटकवेन, हे अगदी नक्की आहे.' अमृता आणि सैफने 1991 साली लग्न केलं. तेव्हा अमृता सैफपेक्षा 13 वर्षांनी मोठी होती. तेव्हा सैफ 20 वर्षांचा आणि अमृता 33 वर्षांची होती. सैफ आणि अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं.