मुंबई : आठव्या दिवशी केदारनाथ या सिनेमाने खिडकीवर चांगली पकड बनवली आहे. सारा अली खानचा डेब्यू सिनेमा केदारनाथचा ट्रेलर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता सगळ्यांची नजर या सिनेमाच्या कलेक्शनकडे आहे. एक आठवडा उलटूनही या सिनेमाला प्रेक्षकांच भरपूर प्रेम मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलीजनंतर हा सिनेमा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा सिनेमा उत्तराखंडमध्ये चित्रीत करण्यात आला आणि तिथेच सिनेमा कडाडून विरोध करत बंदी लावण्यात आली. लव जिहादचा मुद्दा सांगत या सिनेमाला विरोध केला. असं असतानाही सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 


केदारनाथ सिनेमाने शुक्रवारी 7.25 करोड, शनिवारी 9.75 करोड आणि रविवारी 10.75 करोड, सोमवारी 4.25 करोड, मंगळवार 3.75 करोड , बुधवारी 3.25 करोड आणि गुरूवारी जवळपास 3 करोड तर शुक्रवारी 3.10 करोड रुपयांची कमाई केली आहे. 


या सिनेमाने आतापर्यंत 45.10 करोड रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाच बजेट 35 करोड रुपये आहे. केदारनाथ या सिनेमासाठी येणारा आठवडा सोपा नाही. 21 डिसेंबर रोजी शाहरूख खानचा 'झिरो' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भरपूर बजेट आणि बिग स्टारर हा सिनेमासमोर केदारनाथ टिकेल का असा सवाल पडला आहे. 


केदारनाथ सिनेमात हिंदू टूरिस्ट (सारा अली खान) आणि मुस्लिम पिट्ठू (सुशांत सिंह राजपूत) यांच्या प्रेम कहाणीवर हा सिनेमा आधारित आहे. सुशांत सिंह एक गाइडच्या रुपात साराला भेटून भगवान शिव दर्शन करते. 14 किमीचा त्यांचा प्रवास असतो.