`.... दिसतेस`, Sara Ali Khan चं पोट पाहून चाहते हैराण
सारा आली खानच बॉडी ट्रांसफॉर्मेशन? अभिनेत्रीचं पोट पाहून चाहत्यांना पडला मोठा प्रश्न
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींचा सर्वात काळजी आणि चिंतेचा विषय म्हणजे परफेक्ट फिगर. स्वतःला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री दिवसातील अनेक तास जीम आणि योग साधना करण्यात व्यस्त असतात. अशाचं फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री सारा अली खान. सारा अली खान फिटनेससाठी ओळखली जाते. सारा अली खानने वजन कमी करून स्वतःला पूर्णपणे बदलले आहे. पण आता सारा तिच्या परफेक्ट फिगरमुळे चर्चेत
आली आहे.
सध्या साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सारा पांढऱ्या टी-शर्ट आणि गुलाबी रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. साराचे मोकळे केस आणि तिच्या पायात गुलाबी चप्पल... साराची क्यूट स्टाईल चर्चेत असली तरी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
सारा पाहण्यासाठी दररोज पापाराझी घराबाहेर पोहोचतात. जवळपास रोजच जिम, योगा आणि पिलेट्सचे क्लासेस करणारी सारा पुन्हा एकदा स्पॉट झाली, पण आता साराचं पोट पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.
साराच्या फोटोंवर कमेंट करत नेटकरी लिहितात 'सारा कुपोषित दिसत आहे', तर दुसऱ्या युजरने साराचं पोट पाहून विचारल की, 'एवढ्या पातळ पोटावर आणि कंबरेवर पॅन्ट कशी थांबवते?' सध्या साराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
साराबद्दल सांगायचं झालं, तर ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'केदारनाथ' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या साराने कधीही मागे वळून पाहिलं नाही.