मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. तिच्या आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याच्या चर्चा तर सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरलेल्या आसतात. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या सारा स्वत:च्या गाण्यावर थिरकताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केदारनाथ' चित्रपटातील 'स्विट हार्ट' गाण्यावर साराच्या अदा चाहत्यांना प्रचंड प्रमाणात घायाळ करत आहेत. खुद्द साराने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'आमचं पहिलं गाणं' असे लिहिले आहे.   


कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.