VIDEO : बाईकवर स्वार सारा - कार्तिक
कार्तिक - साराचा बाईक राईड करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या खाजगी आयुष्या बद्दल चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असतात. मागील काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सध्या कार्तिक - साराचा बाईक राईड करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही नवीन जोडी दिल्लीच्या रस्तावर बाईक राईडींगची मजा घेताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ६' मध्ये सारा तिच्या वडीलांसोबत उपस्थित होती. या प्रश्न - उत्तरांच्या शो मध्ये कार्तिक माझा क्रश असल्याचे तिने सांगितले होते. पण आता सारा थेट कार्तिकच्या बाईक बसल्याचे दिसून येत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल भयानी नावाच्या एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. कार्तिक - सारा सध्या दिग्दर्शक इम्तियाझ अली यांच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यग्र आहेत. 'लव आज कल २' सिनेमाची शूटींग सध्या दिल्ली मध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कार्तिक - सारा पहिल्यादांच एकत्र झळकणार आहेत.