नवरा-बायकोचं भांडण आता चव्हाट्यावर, लाईव्ह शोमध्ये सेलिब्रिटी कपलची बाचाबाची
शोमध्ये दोघेही एकत्र दिसले असले तरी दोघांच्याही डोळ्यात आनंद दिसत नाही.
मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खान आणि अभिनेता अली मर्चंट सध्या कंगना राणौतच्या लॉकअप या शोमध्ये दिसत आहेत. शोमध्ये दोघेही एकत्र दिसले असले तरी दोघांच्याही डोळ्यात आनंद दिसत नाही.
सारा आणि अली दररोज शोमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडताना दिसतात आणि दोघेही एकमेकांवर आरोप करत असतात. आता अलीकडेच दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला आणि सारा तिच्या Ex Husband वर चिडली.
सोशल मीडियावर एक एपिसोड शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सारा अली मर्चंटवर खूप रागावली आहे. सारा म्हणते, 'मी तुझ्याशी बोलत नसताना तू पुन्हा बोलण्याचा प्रयत्न का करत आहेस. माझ्यावर जो ठप्पा बसला आहे, त्याचा त्रास मला अजूनही सहन करावा लागात आहे. आता तू पुन्हा मला त्रास द्यायला आला आहेस."
साराचे म्हणणे ऐकून अलीही गप्प बसत नाही. तो साराला म्हणतो, 'तु कशी वागत आहेस हे मला माहित आहे, त्यामुळे तू आतापर्यंत स्वत:चं आयुष्य बदलू शकली नाहीस." अलीचं हे बोलणं ऐकून सारा खूपच भडकते.
'लॉकअप' या शोमध्ये स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. सारा आणि तिच्या पतीचा वाद आता शोमुळे खूपच चर्चेत आला आहे.