लग्न अभिनेत्रीसोबत, पण संबंध तिच्या असिस्टंटसोबत...
`मी त्याला प्रत्येक वेळी संधी दिली आणि प्रत्येक वेळी त्याने मला फसवलं. मी त्याच प्रत्येक खोटं पकडलं आहे.
मुंबई : रिअॅलिटी टीव्ही शो 'लॉकअप'मधील स्पर्धक आणि अभिनेत्री सारा खानने तिचा पूर्वाश्रमीचा पती अली मर्चंट याच्याबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे.
अभिनेत्रीने या शोमध्ये सांगितले की तिचे अली मर्चंटसोबतचे नाते का संपुष्टात आले. या रिअॅलिटी शोमध्ये अली मर्चंट देखील दिसला आहे, अशा परिस्थितीत सारा जेव्हा अलीसोबत समोर येते तेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटते.
पण या शोमध्ये अली सारासोबत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तिच्याशी बोलण्याची संधी शोधत असतो. दरम्यान, साराने अली मर्चंटसोबतच्या घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे.
हा निर्णय तिने का घेतला होता याची संपूर्ण कहाणी तिने शोमधील स्पर्धक करणवीर बोहराला सांगितली आहे.
साराने म्हटले आहे की, 'मी त्याला प्रत्येक वेळी संधी दिली आणि प्रत्येक वेळी त्याने मला फसवलं. मी त्याच प्रत्येक खोटं पकडलं आहे.
साडेतीन वर्षात मी त्याला 300 वेळा संधी दिली असेल. तो माझं पहिलं प्रेम होता. त्याला विसरणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. त्याला आणि झालेला प्रकार विसण्यासाठी मला साडेचार वर्षे लागली.यानंतर करणवीरने साराला विचारले, 'तो क्षण कोणता होता जेव्हा तुला वाटले की आता मला यातून बाहेर पडायचं आहे'
या प्रश्नाचं उत्तर देत सारा म्हणाली, 'लोखंडवालामध्ये माझा एक स्पा स्टुडिओ आहे. जो मी पार्टनरशीपमध्ये चालवते. अलीही त्यात सामील होता.तिथे अली मर्चंटने एक असिस्टंट मॅनेजर ठेवली होती.
काही व्यक्तींकडून मला अली आणि तिच्या संबंधांबद्दल कळलं. तेव्हा मला विश्वास झाला की, अलीचं माझ्या मॅनेजरसोबत अफेअर आहे. आणि तो मर्यादा पार करत आहे. त्यानंतर आमचं नातं तुटलं.
सारा खान आणि अली मर्चंटने बिग बॉस 4 मध्ये लग्न केले होते आणि लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच त्यांचा घटस्फोट झाला होता.