मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळेस तिच्याबाबत एक वेगळीच चर्चा सुरु आहे. यावेळेस ती अफेअरमुळे चर्चेत आली आहे. नेमकं तिचं कोणासोबत अफेअर आहे? हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा तेंडूलकरचे (Sara Tendulkar) नाव एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. या बॉलिवूड अभिनेत्यासोबत साराचे अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. तसेच या अभिनेत्यासाठी सारा लंडनहून पळून भारतात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा किती खरी आहे, हे पाहूयात. 


 


हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर होतेय ट्रोल, 'हे' आहे कारण


 


प्रकरण काय?


सारा तेंडूलकरने (Sara Tendulkar) अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोत ती बाल्कनीत उभी राहून हसताना दिसत आहे. तिचा हा फोटो खुपच सुंदर असून त्यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. 


सारा तेंडूलकरचा (Sara Tendulkar) हा फोटो बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि गायक अरमान मलिकला खूपच आवडला. आणि त्यांनी तो फोटो लाईक केला आहे. फॅन्सच्या नजरा कार्तिकने लाईक केलेल्या फोटोवर खिळल्या. त्यानंतर नेटकऱ्यांनी कार्तिक साराला लाइक करत असल्याच्या कमेंट करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर साराला कार्तिकसाठी लंडन सोडून भारतात यायचं असल्याच्या अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या. 


सारा तेंडूलकरच्या (Sara Tendulkar) या फोटोवर आलेल्या कमेंटवरून सारा आणि कार्तिकमध्ये (Kartik Aaryan) अफेअर सुरु असल्याची चर्चा सुरू झाली होती.तसेच या दोघांच नाव जोडण्यामागचा हा पहिला प्रसंग असावा. त्यामुळे ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले होते. दरम्यान याआधी सारा तेंडूलकरच नाव युवा क्रिकेटर शुभमन गिल सोबत देखील जोडलं जात. मात्र या निव्वळ अफवाच आहेत. दोघांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.