मुंबई  : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोंची चर्चा होत असते. 2022 मध्ये आयपीएलच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती चर्चेत आली. आता तिचे मराठमोळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निळ्या रंगाची साडी नेसून साजश्रुंगार करून सारा तेंडुलकर नटून थटून हातात कलश घेऊन उभी असल्याचं दिसत आहे. साराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पारंपारिक आणि मराठमोठ्या अंदाजात तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. 


नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर गळ्यात सुंदर साज असा साराने लूक केला आहे. तिच्या या लूकसमोर बाकीचे फोटो फारच फिके पडल्याचं दिसत आहे. सारा तेंडुलकरचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला. 


मिळालेल्या माहितीनुसार सारा तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर एका लग्न सोहळ्यात गेले होते. तिथे सारा करवली म्हणून असल्याचं तिच्या या फोटोंमधून दिसत आहे. कुटुंबातील या सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि साराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  


हा विवाह सोहळा जे डब्लू हॉटेलमध्ये पार पडला. फोटोग्राफर समीर वसाईकर यांनी आपल्या फेसबुकवर या सोहळ्यातील खास क्षणांचे फोटो शेअर केले. यामध्ये सारा आणि सचिन तेंडुलकर यांचा फोटोही आहे. 


मराठमोठ्या पद्धतीनं विवाह सोहळा पार पडल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. सचिन आणि साराने या सोहळ्यातील सगळ्या विधींना विशेष उपस्थित होते. त्यांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.