मुंबई : भारतीय संघाचा खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) कायमच चर्चेत राहिली आहे. इंस्टाग्रामवर साराचे 1.2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. 23 वर्षांच्या साराचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. साराचं कौतुक तर होतंच पण त्यासोबत त्या टीका देखील सहन करावी लागली आहे. 


साराच्या कॉफीची जोरदार चर्चा 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा तेंडुलकरला अनेकदा सोशल मीडिया ट्रोलला देखील सामोरं जावं लागतं. एवढंच नव्हे तर 16 एप्रिलला संध्याकाळी महिलेने साराची मस्करी करण्याचा प्रयत्न केला. साराने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती कारमध्ये बसून कॉफी घेत आहे. ''ब्लू टोकाई कॉफी (Blue Tokai Coffee) जिंदगी बचाती है' असं पोस्ट केलं आहे. 




वडिलांचे पैसे फुकट घालवतेस म्हणतं झाली ट्रोल 


ही स्टोरी शेअर केल्यानंतर महिला युझरने सारा तेंडुलकवर टीका झाली. सचिनचे पैसे फुकट घालवतेस असे बोल लावण्यात आले. साराने ही पोस्ट शेअर केली आहे. याला सारा उत्तर देताना म्हणते की,'कोणताही पैसा जो कॉफीवर खर्च झालाय. तो या पैशाचा योग्य वापर आहे. याला फुकट घालवणं म्हणतं नाहीत.'