मुंबई : लोकप्रिय क्रिकेट खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर कायमच चर्चेत असते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. साराचं नाव धक्कड बल्लेबाज शुभमन गिलसोबत जोडलं गेलंय. सारा तेंडुलकर हैदराबादमध्ये सामना पाहायला गेली होती. तेव्हाचा साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


या खास व्यक्तीचा सामना बघायला गेली सारा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफचा सामना पाहण्यासाठी सारा हैदराबादला गेली होती. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाईसोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली. जिथे दोघांनी हैदराबादला जात असल्याचे सांगितले. 10 डिसेंबरपासून बॉलीवूड टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ हैदराबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मॅट्रिक्स फाईट नाईट असे या कार्यक्रमाचे नाव आहे.



लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया


सारा तेंडुलकरचा हैदराबादला जाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. साराच नाव लोकांनी शुभमन गिलसोबत जोडण्यास सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने लिहिले. 'शुबमनची फसवणूक झाली आहे.'


 


 



शुभमन गिलला फॉलो करते सारा 


शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. एवढेच नाही तर दोघेही एकमेकांच्या कुटुंबाला फॉलो करतात. शुभमन गिलने साराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना फॉलो केल्यास नवल नाही. पण साराच्या शुभमनच्या बहिणींना फॉलो करणे अनेक प्रकारे सूचित करते. सारा गिलची बहीण सेहनील गिलला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. साराने नुकतेच मॉडेलिंगमध्येही प्रवेश केला आहे. तिने ब्रॉडसाठी एक जाहिरात केली आहे.


शुभमनने केला होता खुलासा 


अलीकडेच सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या डेटींगची बरीच चर्चा झाली आहे. गिलने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की तो सिंगल आहे. गिलने इंस्टाग्रामवर लोकांसोबत प्रश्नोत्तरांचे सत्र करून सिंगल असल्याबद्दल सांगितले होते.