मुंबई : मित्रमंडळींसाठी कधीही कोणत्याही क्षणी धावून जाणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर साराने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज सारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते पण तिचा स्वभाव देखील चाहत्यांना फार आवडतो. दुसरीकडे आपल्या मित्रांसाठी कधीही हजर असणाऱ्या साराने ड्रग्स प्रकरणानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची साथ सोडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रियाची साथ सोडल्यानंतर साराने अभिनेत्री जान्हवी कपूरचा हात धरला आहे. नुकताचं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी केदारनाथला गेल्या होत्या. दोघींनी सहलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या दोघींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघी एकत्र जिम करताना देखील दिसल्या होत्या. 



एवढंच नाही तर सारा आणि जान्हवी अभिनेता रणवीर सिंगच्या 'द बिग पिक्चर' शोमध्ये देखील आल्या होत्या. बॉलीवूडमध्ये असे म्हटले जाते की प्रसिद्ध अभिनेत्री मित्रीणी असू शकत नाहीत, परंतु काळाबरोबर ही म्हण देखील बदलत आहे. याचं उत्तम उदाहरण सारा आणि जान्हवी आहे. सध्या सारा आणि जान्हवी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 


सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच अक्षय कुमार आणि दक्षिणेतील सुपरस्टार धनुष यांच्यासोबत आनंद एल राय दिग्दर्शित 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात सारा दुहेरी भूमिका साकारतना दिसणार आहे. जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटी हॉरर कॉमेडी फिल्म 'रुही' मध्ये दिसली होती. लवकरच ती 'दोस्ताना 2' आणि 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसणार आहे.