मुंबई : काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते सतीश कौशिकला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, आता सतीश कौशिक ठीक आहेत.  ते दवाखान्यातून घरी परतले आहेत. पण सतीश कौशिश सध्या खूश नाही आहेत, कारण त्यांच्या मुलीलाही कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली होती. आता ती रुग्णालयात दाखल झाली आहे. सतीश कौशिकच्या मुलीचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु तिची प्रकृती खालावली असल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तानुसार, सतीश कौशिक म्हणाले की, ''मी बरा होत आहे आणि काही दिवस घरी क्वारंटाईन राहणार आहे, परंतु माझी मुलगी वंशिका गेल्या पाच दिवसांपासून रूग्णालयात आहे. तिचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु तिचं तापमान कमीच होत नाही आहे. कृपया तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा''. सतीश कौशिकची मुलगी वंशिका अजूनही लहान आहे.


लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका जास्त असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी व्यक्तीपेक्षा वीक असते. सतीश कौशिश म्हणाले की, '' लहान मुलांची इम्यून सिस्टम वीक असणे हा एक मुद्दा आहे. कोविड बद्दल कोणतीही खात्री नाही. सर्वात वाईट म्हणजे वंशिकाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु तरी ती अजूनही आजारी आहे. तिचा ताप 100 ते 101 च्या तापमानात आहे. तिच्या फोनवरील रडण्याचा आवाज ऐकून माझं हृदय तुटतं. या कठीण प्रसंगी देवा आमच्या मुलांना निरोगी ठेव''.


महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचं प्रकार वाढत आहेत. सिनेमा आणि टीव्ही कलाकार देखील कोरोनाच्या जाळ्यात अडकत  आहेत. एकामागून एक कलाकार कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. याआधी सतीश कौशिकशिवाय रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, तारा सुतारिया, संजय लीला भन्साळी, सिद्धांत चतुर्वेदी यांसारखे अनेक कलाकार कोरोना पॉझिटीव्ह आले होते