Satish Kaushik Death : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे काल 8 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी बॉलिवूड अभिनेते आणि सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी दिली. वयाच्या 66 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोन दिवस आनंदानं होळी साजरा करत असलेल्या सतीश कौशिक यांना अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला नेमकं त्यावेळी काय झालं होतं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान, आता ही घटना कशी झाली याच्या डिटेल्स समोर आल्या आहेत. (How satish Kaushik Had hearth attack) 


सतीश कौशिक यांच्या हृदयविकाराच्या झटक्याचा घटनाक्रम आला समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतीश कौशिक यांनी 7 मार्च रोजी मुंबईत चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि कुटुंबासोबत होळी साजरी केली. त्यानिमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश कौशिक यांनी सगळ्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काल म्हणजेच 8 मार्च रोजी सतीश कौशिक हे गुरुग्रामला पोहोचले होते. यावेळी देखील सतीश कौशिक यांनी जोषात होळी साजरी केली. त्यानंतर सतीश कौशिक त्यांच्या मित्राला भेटायला पोहोचले होते. त्यावेळीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला बोलावलं आणि मला रुग्णालयात घेऊन जा असे सांगितलं. त्यानंतर ड्रायव्हर आला आणि त्यानं सतीश कौशिक यांना गाडीत बसवलं. सतीश कौशिक यांचा ड्रायव्हर त्यांना  फोर्टिस रूग्णालयात घेऊन जात होता. पण रुग्णालयात पोहोचण्याआधी, रात्री 1 वाजता गाडीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी सतीश कौशिक यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. पहाटे 5.30 वाजता त्यांच्या पार्थिवाचे दीनदयाल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आता त्यांचं पार्थिव लवकरात लवकर मुंबईत आणलं जाणार आहे. 



हेही वाचा : Satish Kaushik Death : निधनाआधी सतीश कौशिक यांनी शेअर केली होती 'ही' अखेरची पोस्ट


सतीश कौशिक यांच्या करिअर विषयी बोलायचे झाले तर, ते फक्त अभिनेता नव्हते. सतीश कौशिक हे निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक सुद्धा होते. सतीश कौशिक यांना आजही लोक 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील कॅलेन्डर या भूमिकेसाठी ओळखतात. सतीश कौशिक यांनी मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सतीश कौशिक यांनी त्यांचे अभिनयाचे धडे हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून केले.