Aamir Khan Mr India : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा आज 14 मार्च रोजी 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खाननं एक चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  'यादों की बारात' असं या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटसृष्टीतून असूनही आमिरनं करिअरमध्ये खूप स्ट्रगल केलं. आज आमिर लोकप्रिय कलाकारांपैकी आहे. इथे पोहोचण्यासाठी त्यानं फार मेहनत घेतली. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये? दिवंगत अभिनेता सतीश कौशिर यांनी 'मिस्टर इंडिया' या चित्रपटासाठी आमिरला रिजेक्ट केलं होतं? काही काळापूर्वी आमिरनं एका मुलाखतीत या विषयी खुलासा केला होता. तेव्हा आमिरनं दिग्दर्शक आणि निर्माता शेखर कपूर यांचं असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खाननं 'ह्यूमंस ऑफ बॉम्बे' ला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शेखर कपूर यांचा  असिस्टंट ते अभिनेता होई पर्यंतचा संपूर्ण प्रवासाविषयी आमिरनं सांगितलं. आमिरनं सांगितलं की त्याला शेखर कपूर फार आवडायचे. त्यांचा असिस्टंट म्हणून आमिरला काम करायचं होतं. त्यानं त्याशिवाय दुसरं काही स्वप्न पाहिलंच नाही. त्यावेळी शेखर कपूर 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट बनवत होते. मात्र, या चित्रपटात सतीश कौशिक देखील होते, ते फक्त कॅलेन्डरची भूमिका साकारत नव्हते तर त्यासोबत चीफ असिस्टंट डायरेक्टर देखील होते.  


आमिर खाननं सांगितलं की सतीश कौशिक असिस्टंट डायरेक्टरसाठी एक मुलाखत घेत होते. त्या गोष्टीला आठवत आमिरनं सांगितलं की तो शेखर कपूर यांना भेटायला गेला होता. ते त्याच्या आवडत्या निर्मात्यांपैकी एक आहेत. आमिरनं शेखर कपूर यांना सांगितलं त्याला त्यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम करायचं आहे. त्यानंतर त्याची आणि शेखर कपूर यांची पुन्हा भेट झाली.  त्यावेळी आमिरनं त्यांना त्याचे सगळे डॉक्युमेंट्स दाखवले की त्याला काय काय काम येतं आणि तो काय काय करु शकतो. शेखर कपूर यांना आमिरचं पेपर वर्क फार आवडलं. आमिरनं सांगितलं की त्यावेळी चित्रपटसृष्टीत कोणी इतकं पेपरवर्क करत नव्हतं. 


मात्र, आमिर खानला ही संधी मिळाली नाही. सुरुवातीला आमिरला त्याचं कारण कळलं नाही, नंतर सतीश कौशिक यांनी सांगितलं तेव्हा त्याला आश्चर्य झालं. सतीश आमिरला म्हणाले, तू जेव्हा भेटायला आला होतास, तेव्हा तू गाडी घेऊन आला होतास आणि माझ्याकडे गाडी नव्हती. मला वाटलं या ज्युनियरला हायर केलं, तर त्याच्याकडे गाडी आहे. तर आमिरनं सांगितलं की तो जेव्हा आला होता तेव्हा त्यानं शॉर्ट्स परिधान केलं होती आणि हातात बॅडमिनटन रॅकेट होतं. तसाच तो गाडी घेऊन तिथे पोहोचला होता. मात्र, आमिरनं नंतर सतीश कौशिक यांना सांगितलं की ती गाडी त्याची नव्हती. त्यादिवशी तो कोणा दुसऱ्याची गाडी घेऊन आला होता. तर आमिरला धक्का बसला होता की त्याला सतीश यांनी फक्त या कारणामुळे नकार दिला होता.