Satish Shah : बॉलिवूड अभिनेता सतीश शाह यांनी अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या भूमिका या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्यातल्या त्यात त्यांच्या कॉमेडी मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेल्या आहेत. फक्त चित्रपट आणि मालिका नाही तर ते खऱ्या आयुष्यातही तितकेच विनोदी आहेत असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं. ज्यामुळे त्यांना अनेकवेळा वाईट अनुभव आला आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतीश यांची पत्नी रुग्णालयात ऍडमिट असताना.  त्यांच्या या कठीण काळात एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि मूड हलका करण्यासाठी त्यांना जोक ऐकवा म्हणून रिक्वेस्ट केली. सतीश शाह यांनी अशावेळी जोक नाही तर  त्या व्यक्तीला ठोसा मारावासा वाटत होता, अशी इच्छा झाल्याचे सांगितले.  CNN-News18 ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, सतीश यांनी सांगितले कि  केले की 'भारतीय प्रेक्षक अनेकदा अभिनेता आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकेत फरक करण्यात अपयशी ठरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर कोणी विनोदी कलाकार असेल तर लोक त्यांच्याकडून नेहमी विनोदांची अपेक्षा करतात. पण आपल्याला त्याच्यासोबतच जगावे लागते. माझी पत्नी खूप आजारी होती. ती जवळजवळ ऑपरेशन थिएटरमध्ये मरणाशी झुंज देत होती. मी खूप अस्वस्थ होतो. आमच्या लग्नाला फक्त तीन महिने झाले होते. तेव्हा मी चिंतेत बाहेर बसलो होतो. अशातच एक व्यक्ती तिथे आली आणि म्हणाली, 'काय यार, तू इतका गंभीर होऊन बसला आहेस. हे चांगलं दिसत नाही, एखादा जोक ऐकव.' अशावेळी मला जोक नाही तर त्याला ठोस मारायची इच्छा झाली. पण मी  समजूतदारपणे वागलो आणि शांतपणे तिथून निघून गेलो.


हेही वाचा : ...तर शाहरुख मला काटेरी चमच्याने भोसकेल; काजोलनं केला होता खुलासा


सतीश शाह यांच्या पत्नीचे नाव मधु शाह असून 1972 साली त्यांचे लग्न झाले. सतीश यांनी 'हम आपके है कौन', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'जुडवा', 'मैं हूं ना', 'मुझसे' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'जाने भी दो यारो', 'वीराना','अर्ध सत्य','अंजाम' आणि 'ठाणेदार' यासोबतच त्यांनी अनेक शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'फना' आणि 'ओम शांती ओम' या चित्रपटांव्यतिरिक्त ते 'ये जो है जिंदगी' आणि 'साराभाई Vs साराभाई' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये देखील झळकले. ‘हमशकल्स’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. आता राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटात ते दिसणार आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू, विक्की कौशल आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत आणि 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे