मुंबई : तब्बल 40 वर्षांच्या बंदीनंतर सौदी अरेबियात पुन्हा एकदा चित्रपटांच्या प्रदर्शनला सुरूवात झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी एका भव्य क्रार्यक्रमात  ब्लॅक पँथर हा इंग्रजी चित्रपट 40 वर्षानंतर प्रथमच 45 फूटी पडद्यावर दाखवण्यात आला. यावेळी सरकारचे वरिष्ठ अधिकारी, अनेक देशांचे राजदूत, आणि प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारीच सामान्य नागरिकांसाठी तिकीट विक्री सुरू झालीय.  चित्रपट गृह सुरू करण्याच्या निर्णयाकडे सौदी अरेबियात नव्या पर्वाची नांदी म्हणून बघितलं जातंय. याआधी महिलांना कार चालवण्याची, लोकांना संगीताचे कार्यक्रम आणि फॅशन शोला जाण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय बॉलीवूडचे निर्मात्यांसाठी आर्थिक फायद्याचा ठरणार आहे यात शंका नाही. 


सौदीमध्ये हा शो केवळ निमंत्रण केलेल्या व्यक्तींसाठी खुला आहे. सामान्यांसाठी याची तिकीट विक्री गुरूवारी होणार आहे आणि हा सिनेमा शुक्रवारी पाहायला मिळणार आहे. सौदी अरबीमध्ये सिनेमाघरात लायसेंस प्राप्त करण्यासाठी अमेरिकन कंपनीने खास प्रयत्न केला आहे. एएमसी असं या कंपनीच नाव आहे. सौदी अरबीमध्ये लागलेल्या बॅन गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये हटवण्यात आलं आहे. 


शाही डिक्रीनुसार देशांत सिनेमा घर खुले केले जाणार आहेत. या निमित्ताने नव्या एका पर्वाची निर्मिती होणार आहे. यासोबतच आता महिलांना लवकरच कार चालवण्याची, लोक संगीत कार्यक्रम, फॅशन शो सारख्या कार्यक्रमांना जाण्याची संधी दिली आहे.