Saumya Tandon Opens up About Her Eve Teasing : छोट्या पडद्यावरील 'भाबीजी घर पर हैं! (Bhabi Ji Ghar Par Hai!) या लोकप्रिय मालिकेत अनीता भाभीची भूमिका साकारलेली अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) काही दिवसांपूर्वी अभिनयना पासून दूर झाली. सौम्याचे लाखो चाहते आहेत. तिनं मालिकासोडली तरी तिच्या लोकप्रियतेत काही कमी झाली नाही. दरम्यान, सौम्याही इव्ह टीझींगचा शिकार झाली आहे. या घटनेनंतर सौम्या खूप घाबरली आहे. खरंतर एका व्यक्तीनं सौम्याचे भांगेत सिंदुर भरला. नक्की हे कसं झालं आणि काय आहे प्रकरण जाऊण घेऊया... या विषयी सौम्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौम्यानं नुकतीच 'हॉटरफ्लाई' ला मुलाखत दिली होती. यावेळी सौम्यानं तिच्यासोबत झालेल्या ईव्ह-टीझिंगविषयी सांगितलं. हा संपूर्ण प्रकार उज्जैनमध्ये झाला होता. येथे एका मुलानं तिच्या भांगेत सिंदुर भरला, तर दुसऱ्यावेळी एका मुलानं तिला ओव्हरटेक केलं आणि ती पडली होती. याविषयी सांगताना सौम्या म्हणाली, "हिवाळ्याच्या दिवसात ती रात्री घरी परतत होती. तेव्हा एका मुलानं त्याची बाईक थांबवली आणि माझ्या भांगेत सिंदुर भरला आणि नंतर कुंकू फासल. या घटनेनंतर सौम्या खूप घाबरली होती."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यानंतर दुसऱ्या घटनेविषयी बोलताना सौम्या म्हणाली, 'एकदा ती शाळेतून घर येत होती. ती सायकलवर होती आणि या दरम्यानचं एका मुलानं तिला ओव्हरटेक केलं, ज्यामुळे ती रस्त्यावर पडली. या अपघताता सौम्याच्या डोक्याला खूप मोठी दुखापत झाली होती आणि तिचं हाड तुटलं.'


सौम्याने पुढे सांगितले की, ती रडत राहिली आणि मदतीसाठी वेदनेनं ओरडत राहिली पण कोणीही तिला मदत केली नाही. जेव्हा ती उज्जैनमध्ये रहायला होती तेव्हा तिचा संपूर्ण वेळ हा स्वत:चं संरक्षण करण्यातच घालवायची. कधी लोक रस्त्यांवर तर कधी काही लोक तिच्या मागे लागायचे. कधी लोक तिला कट मारायचे तर कधी भिंतीवर चुकीच्या गोष्टी चिट्ठीत लिहून फेकायचे.


हेही वाचा : Sidharth-Kiara Advani Wedding : लग्नानंतर कियारानं ओलांडलं माप; सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून सासरी असं झालं स्वागत


सौम्यानं 2008 मध्ये अफगाणी मालिका 'खुशी'मधून अभियन क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर सौम्यानं काही शोचे सुत्रसंचालन केले. यानंतर सौम्या ही 'जब वी मेट' चित्रपटातही दिसली. या चित्रपटात सौम्यानं करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पण सौम्याला  खरी ओळख आणि लोकप्रियता ही 'भाबीजी घर पर हैं!' मालिकेतून मिळाली.