मुंबई : ८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या सविता दामोदर परांजपे नाटकावर आधारित सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा असून त्यात सुबोध भावे आणि तृप्ती तोरडमल प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय या सिनेमात राकेश बापट, पल्लवी पाटील, अंगद म्हसकर आणि सविता प्रभुणे हे कलाकारही आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''आठ वर्षांचा त्यांचा सुखी संसार एका विचित्र आजाराने दुभंगतोय.. आणि समोर येतंय एक भयंकर आणि जीवघेणं सत्य...!! कसा सामना करणार ते दोघं या परिस्थितीचा...!!'', असे सिनेमाच्या ट्रेलरसोबत नमूद करण्यात आले आहे. येत्या ३१ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


या सिनेमाचा ट्रेलर दमदार, भयंकर आणि धक्कादायक आहे. तो पाहुन तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतील आणि सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढेल. यात शंकाच नाही.


पाहा सिनेमाचा ट्रेलर....



सध्या बॉलिवूडकरांना मराठीचे वेध लागलेत, हे आपण जाणतोच. या सिनेमाची ही एक विशेष बाब आहे. ती म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम मराठीत पर्दापण करत आहे. या सिनेमाची निर्मिती जॉनने केली आहे.