मुंबई : राज्यभरातील युवा रंगकर्मींसाठी ऊर्जेचा स्त्रोत असणाऱ्या सवाई एकांकिका स्पर्धेचा जागर मुंबईत पार पडला. २५ जानेवारीला सायंकाळी सुरु झालेली ही स्पर्धा २६ जानेवारीला सकाळच्या सुमारास निर्धारित वेळेत पार पडली. यंदाच्या वर्षी सवाईमध्ये कल्याणच्या 'अ बास्टर्ड पॅट्रिऑट' या एकांकिकेने बाजी मारत विजेतेपदाचा मुकुट पटकावला. तर, रुईया महाविद्यालयाची 'बुद्रुकवाडीचा मारुती बाटला' ही एकांकिका उपविजेती ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ब्रम्हास्त्र' या एकांकिकेला प्रेक्षक पारितोषिक विजेत्या एकांकिकेचा बहुमान मिळाला. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे तरुणाईचा हा जागर रात्रभर सुरू होता. नाट्यगृहात आणि नाट्यगृहाबाहेरही तेव्हढीच गर्दी याहीवेळी दिसून आली. चतुरंग प्रतिष्ठानकडून आयोजित करण्यात आलेल्या या नाट्यमैफिलीला रसिकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. 



वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप


यंदाच्या वर्षीचं सवाई  सवाईमध्ये एक नवा आणि स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, पंडित सत्यदेव दुबे, विनय आपटे, रिमा लागू, राघू बंगेरा, अरुणकाका काकडे, रघुवीर तळाशीलकर यांच्या नावे स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकं देण्यात आली. त्यामुळे नवख्या कलाकारांना त्यांच्या कलेची दाद म्हणून जणून दिग्गजांचा आशीर्वादच मिळाला असं म्हणायला हरकत नाही.