``परदेशात येऊन वडापाव खाणं म्हणजे...`` लंडनमध्ये सायली संजीवची खास दावत
Sayali Sanjeev in London: अभिनेत्री सायली संजीव ही चांगलीच लोकप्रिय आहे ती तिच्या हटके लुकसाठीही अनेकदा चर्चेत असते. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावेळी ती लंडनमध्ये मस्त वडापावचा आस्वाद (Vadapav in London) लुटता दिसते आहे.
Sayali Sanjeev in London: आपल्या इथला वडापाव (Vadapav) हा जगभरात पोहचला आहे. आपणही जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपल्याला आपल्या घरच्या खाण्याची आठवण येतेच येते. तेव्हा आपल्यासाठीही परदेशात आपले पारंपारिक पदार्थ शोधण्यासाठी धडपड सुरू होते. आता परदेशातही भारतीय पदार्थांचे रेस्टोरंट्स आहेत. तेव्हा अशा रेस्टोरंट्सला (Indian Resturants Aboard) भेट दिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीलाही याचा मोह आवरला नाही. ही अभिनेत्री सध्या लंडनमध्ये आहे. ती तिची उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे सायली संजीव. परदेशात जाऊन वडापावची मज्जा काय असते याचा प्रत्यय तिलाही आला आहे. सध्या तिची (Sayali Sanjeev Vadapav) ही पोस्ट चर्चेत आहे.
सायली संजीव ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या हटके लुकमुळे कायमच चर्चेत राहते. इन्टाग्रामवरही तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. ती आपल्या चाहत्यांनाही कायमच आपल्या इन्टाग्रामवरून अपडेट ठेवत असते. मध्यंतरी तिच्या आणि क्रिकेटर ऋतूराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad And Sayali Sanjeev) अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, याचीही बरीच चर्चा रंगली होती. त्यामुळे सायली संजीवही अनेकदा चर्चेत राहिली आहे. आता तिच्या या पोस्टचीही सध्या सगळीकडेच चर्चा होताना दिसते आहे. या फोटोमध्ये तूम्ही पाहू शकता की सायली लंडनमध्ये भारतीय पदार्थ विकणाऱ्या हॉटेलच्या बाहेर उभी आहे आणि आपल्या वडापाव एन्जॉय करताना दिसते आहे.
हेही वाचा - VIDEO: पांढरी बनियान आणि शॉर्ट्स; एअरपोर्टवर अशा अवतारानं आल्यानं वरूण धवन ट्रोल!
2016 साली आलेल्या 'झी मराठी'वरील 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. ऋषी सक्सेना आणि सायली संजीव म्हणजेच शिव आणि गौरी यांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. त्यानंतर सायलीनं अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून कामं केली आहेत. त्यानंतर तिचा 2021 साली आलेला 'झिम्मा' हा चित्रपटही बराच गाजला होता. या चित्रपटाचा आता दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे सायली संजीवचीही बरीच चर्चा रंगली आहे.
श्री क्रिश्ना वडा पाव यूके या रेस्टोरंटला तिनं हजेरी लावली आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये या रेस्टोरंटचं नावं लिहित ''परदेशात येऊन वडापाव खाणं म्हणजे.... सुख. मस्त खाणं, मस्त लोकं. या प्रेमासाठी खूप आभार.'' असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्याही कमेंट्स आल्या आहेत.