Scam 2003 : 'रिस्क हैं तो इश्क हैं!' अशी अवास्तव डायलॉगबाजी आपण 2020 साली आलेल्या Scam 1992 या वेबसिरिजमधून पाहिलेली आहे. या वेबसिरिजची तेव्हा चांगलीच क्रेझ होती. एकतर त्यावेळी 80-90 चा तो जुना काळ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.त्यातून तेव्हा घडलेला हा इतका मोठा स्कॅम नक्की काय होता हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच होती. त्यातून आर्थिक घोटाळा म्हटल्यावर या सिरिजला एक वेगळी दिशा आणि या विषयाला एकप्रकारे गांभीर्य होते. त्यामुळे हा सिरिज त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजली होती. त्यातून सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही वेबसिरिज डायरेक्ट केलेली होती. या वेबसिरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. आता याच वेबसिरिजचा दुसरा भाग म्हणजेच Scam 2003 हा नवा विषय पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या या सिरिजची पहिली झलक ही प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. त्यामुळे सध्या या नव्या सिरिजची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी या सिरिजची रिलिज डेट ही जाहीर करण्यात आली आहे. Scam 2003 हा भारतातील सर्वात मोठी स्टॅप पेपर घोटाळा आहे. या स्कॅमचा मास्टरमाईंड अब्दुल करीम तेलगी या कथेचा मुळ नायक आहे. त्यामुळे Scam 1992 प्रमाणे हर्शद मेहता या कथेचा नायक आणि हिरो होता त्याचप्रमाणे या कथेचाही तो नायक अन् हिरो आहे. यावेळी या सिरिजमधून हर्शद मेहताप्रमाणे अब्दुल करीम तेलगीचं पात्र आपल्याला किती डायलॉगबाजी करताना दिसणार आहे याची प्रचिती आपल्याला लवकरच या चित्रपटातून येणार आहे. 


हेही वाचा - Krrish 4 येणार? राकेश रोशन यांची मोठी अपडेट; कंगना की प्रियांका.. कोण असेल हिरोईन?


ही सिरिज 2 सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. तूषार हिरानंदानी यांनी ही सिरिज डिरेक्ट केलेली आहे. त्यामुळे यावेळी यातून कसं स्टोरीटेलिंग प्रेक्षकांसमोर येणार आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी ज्याप्रमाणे Scam 1992 चे संगीत होते तेच संगीत या टिझरच्या मागे ऐकायला येते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


“मला पैसे कमावण्याची हौस नाही कारण पैसे कमावले नाहीतर बनवले जातात”, असा डायलॉग या सिरिजमधून पाहायला मिळतो आहे. त्यामुळे 'पैसा कमाया नहीं बनाया जाता हैं' हा डायलॉग आता 'रिस्क हैं तो इश्क हैं!' ला टक्कर देताना पाहायला मिळतो आहे.