Krrish 4 Update Rakesh Roshan: हॉलिवूडचे अनेक सिनेमे हे लोकप्रिय होताना दिसतात. त्यांच्या अॅक्शन स्टार मुव्हीजची सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्यामुळे त्यांची तरूणांमधील क्रेझ ही आजतागायत कमी झालेली नाही. या चित्रपटांना चांगलीच लोकप्रियताही मिळालेली आहे. परंतु हिंदीमध्ये असे प्रयोग फारसे पाहायला मिळत नाहीत. परंतु राकेश रोशन यांच्या क्रिश या चित्रपटांच्या सिरिजनं एक वेगळीच किमया साधली आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झालेले आहेत. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे क्रिश 3 या चित्रपटाची. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, क्रिश हा चित्रपट बॉलिवूडचे लोकप्रिय सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची प्रेक्षकांना चांगलीच क्रेझ होती. आता त्यांच्या या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते.
आता क्रिश 4 या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटाबद्दल हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटांतून प्रियांका आणि कंगना सारख्या अभिनेत्री आलेल्या आहेत. त्यामुळे यावेळी या चित्रपटांतून नक्की कोणती हिरोईन आपल्या भेटीला येणार आहे याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिलेली आहे. 2003 साली 'कोई मिल गया' हा चित्रपट आला आहे. आता हा चित्रपट पुन्हा एकदा रि-रिलिज होणार आहे. त्यातून आता क्रिश 4 या चित्रपटाचीही जोरात चर्चा आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की या चित्रपटाबद्दल एवढे काय विशेष आहे आणि या चित्रपटातून आपल्याला नक्की काय पाहायला मिळणार आहे. या लेखातून जाणून घेऊया की यावर राकेश रोशन नक्की काय म्हणाले आहेत.
हेही वाचा - चारकोल आईस्क्रीमची बातचं न्यारी; पाहा अफलातून फ्लेवर्स
इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ''आता जे होते आहे ते म्हणजे अजूनही आपला प्रेक्षक हा थिएटर्सपर्यंत येत नाहीये. त्याचा प्रश्न माझ्यापुढे थांड मांडून बसलेला आहे. क्रिश ही माझ्यासाठी फार मोठी फिल्म आहे. आता हॉलिवूडचे मोठे 600 ते 500 मिलियन डॉलरचे सिनेमे लोकंच काय मुलंही पाहताना दिसत आहेत. त्यातून आता जग हे अगदी जवळ आलेले आहे. त्यामुळे याची व्यापी मोठी आहे. आमचा चित्रपट त्यांच्या तुलनेत फार लहान आहे. या चित्रपटाचे बजेट तर 200-300 कोटी रूपये आहे.''
यावेळी त्यांनी चित्रपटाच्या वीफेएक्स आणि इतर तांत्रिक गोष्टींबद्दल माहिती दिली. त्यातून त्यांच्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली आहे. ते म्हणाले की या वर्षांच्या अखेरीस हा चित्रपट येण्याची शक्यता आहे.