मुंबई : 'हंसा एक संयोग' या सिनेमाच्या सेटवर शुटिंगदरम्यान घडलेल्या एका घटनेनं उपस्थितांना चांगलाच धक्का बसलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेटवर ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाहुबली'मध्ये आयटम नंबर करणाऱ्या मॉडेल-अभिनेत्री आणि डान्सर स्कारलेट मेलिश विल्सन एका गाण्याच्या शूटसाठी उपस्थित होती. तेव्हाच तिचा साथी कलाकार उमाकांत राय यानं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. 


यावर स्कारलेट एवढी भडकली की तिनं मागे वळत उमाकांतच्या एक सणकन कानाखाली ठेवून दिली. या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय. या व्हिडिओत उमाकांतचा स्कारलेटला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्नही कैद झालाय.



'हंसा एक संयोग' हा सिनेमा किन्नरांच्या आयुष्यावर आधारीत आहेत. यामध्ये शरद सक्सेना, श्रेया जी शिंदे, अखिलेंद्र मिश्रा, अमन वर्मा आणि दीपशिखा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात स्कारलेट एक आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे. 


या अगोदर स्कारलेट बाहुबली, आर राजकुमार आणि शांघाईसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत आयटम नंबरमध्ये दिसलीय.