मुंबई : बॉलिवुडचे दिग्गज अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सर्व सदस्यांची नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्ट केली गेली. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. प्रत्येकजण कुटुंबाच्या स्वाब चाचणीच्या अहवालाची वाट पाहत होते. पण आता कुटुंबाला कोरोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि आराध्य यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती नानावटी रुग्णालयाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. कोरोना पॉझिटिव्ह आलेले अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती ठीक असल्याचं देखील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.


अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती स्थिर असून दोघांनाही रुग्णालयाच्या आयसोलेशन विभागात ठेवण्यात आले आहे. स्वत: अमिताभ बच्चन ट्विटरवर आपल्या आरोग्याविषयी माहिती देत ​​राहतील अशी माहिती देखील समोर आली आहे.


अमिताभ आणि अभिषेकच्या अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह झाल्यानंतर या दोघांची पुन्हा एकदा टेस्ट होऊ शकते. दुसरीकडे, बीएमसीचे अधिकारी हे बच्चन यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेऊन अशा लोकांना संपर्क करण्याची शक्यता आहे.