Secret Social Media Account Of Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूरने अनेकदा त्याच्या सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंटबद्दल जाहीर मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे. मात्र हे अकाऊंट नेमकं कोणतं आहे? तो कोणत्या नावाने इन्स्टाग्रामवर आहे याचा त्याने खुलासा केलेला नव्हता. पण आता चाहत्यांनी रणबीरचं हे सिक्रेट अकाऊंट चाहत्यांची शोधून काढल्याची चर्चा आहे. रेडीट नावाच्या सोशल मीडिया वेबसाईटवर रणबीर वापरत असलेल्या या अकाऊंट्सची तुफान चर्चा आहे. रणबीर हा केवळ इन्स्टाग्रामवर नसून ट्विटरवरही आहे आणि तिथलं त्याचं अकाऊंटही चाहत्यांनी शोधल्याचा दावा केला जात आहे. या अकाऊंटवरुनच तो सेलिब्रिटींशी गप्पा मारतो, त्यांच्या फोटोंवर कमेंट करतो असं दिसून आलं आहे.


एक्स गर्लफ्रेण्डच्या माध्यमातून शोधलं अकाऊंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर हा विवाहित असून अभिनेत्री आलिया भट्टपासून त्याला राहा नावाची पोरगी आहे. रणबीरने फार कमी लोकांना माझं सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट कोणतं आहे, याची कल्पना असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता चाहत्यांनी रणबीरच्या एका पूर्वाश्रमीच्या कथित गर्लफ्रेण्डच्या माध्यमातून त्याचं इन्स्टाग्राम अकाऊट शोधून काढल्याचा दावा केला आहे.


पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबरचे चॅट


'रेडीट' युझर्सच्या दाव्यानुसार रणबीर कपूरचं हे अकाऊंट 'Reymar_1528'या नावाने आहे. या अकाऊंटवरुन केवळ सेलिब्रिटींच्या पोस्टवर कमेंट केल्या जातात असं नाही तर रणबीरचा सर्वात जवळचा मित्र आणि 'ब्रम्हास्र' चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीही हे अकाऊंट फॉलो करतो. तसेच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननेही ट्वीटरवरुन याच नावाने असलेल्या अकाऊंटवरुन केलेल्या कमेंटला रिप्लाय दिला आहे. 'रेडीट'वर आता या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडून पाहिला जात आहे. माहिरा आणि आयनसंदर्भातील या योगायोगामुळे हाच रणबीर असल्याचा दावा केला जात आहे. या कमेंट्सचे स्क्रीनशॉटही व्हायरल झालेत.



दोघांचा सिगारेट पितानाचा फोटो


दोघांचा सिगारेट पितानाचा फोटो झालेला व्हायरल अन्य एका कमेंटमध्ये माहिराने या अकाऊंटला दिलेल्या रिप्लायमध्ये 'My' असं लिहून पुढे हातातील अंगठीचा इमोजी पोस्ट केल्याचं दिसत आहे. रणबीर आणि माहिरा हे 2017 मध्ये एकमेकांना डेट करत होते अशी मनोरंजनसृष्टीत चर्चा होती. न्यूयॉर्कमध्ये या दोघांचा एकत्र सिगारेट पितानाचा फोटो चांगलाच गाजला होता. मात्र आता रणबीरचं अकाऊंट म्हणून ज्या अकाऊंटचे स्क्रीनशॉट व्हायरल झालेत ते सुरु आहे की बंद पडलं याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.



आता या दाव्यामागील नेमकं सत्य काय हे रणबीरच सांगू शकेल, नाही का?