नवी दिल्ली : मि. परफेक्शनिस्ट असलेला अभिनेता आमिर खान आपला आगामी सिनेमा 'सिक्रेट सुपरस्टार' च्या प्रमोशनसाठी तसूभरही कमी पडत नाहीए. त्याने याही सिनेमात स्वत:ला झोकून देऊन काम केले असून त्याच्या प्रमोशनसाठीही तेवढीच मेहनत घेत आहे. भारतात प्रचार केल्यानंतर आमिर परदेशी गेला आहे. त्यामुळे 'सिक्रेट सुपरस्टार' ही केवढी मोठी फिल्म असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. आमिर खानने सिक्रेट सुपरस्टारला दंगलपेक्षाही मोठी फिल्म असल्याचे घोषित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 २०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'दंगल' हा त्यावर्षातील सर्वोच्च कमाई करणारा सिनेमा ठरला होता. दंगलचा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही गाजावाजा झाला होता.  
 पण आमिरचा असा विश्वास आहे की 'सिक्रेट सुपरस्टार' खूप मोठी फिल्म ठरणार आहे. 'सिक्रेट सुपरस्टार' हा संगीतावर आधारित असलेला सिनेमा आहे. यामध्ये प्रमुख भुमिका करणारी इंसिया उर्फ जायरा वसीम ही एक महत्वकांक्षी गायिका आहे.
१९ ऑक्टोबरला दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. भारत तसेच तुर्कीमध्येही हा सिनेमा १९ तारखेला रिलीज होणार आहे.


आपल्या सिनेमाबद्दल आमिर खूप उत्साहित आहे. तो सिनेमाच्या प्रमोशनची एकही संधी सोडू इच्छित नाही. म्हणून त्याने काही काळ 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही रोखले आहे.