बॉलिवूडचा `शाकाल` सध्या काय करतोय? पाहून बसेल धक्का
1980 मध्ये आलेला `शान` हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
मुंबई : 1980 मध्ये आलेला 'शान' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात खतरनाक खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कुलभूषण खरबंदा यांनी बरीच वाहवा मिळवली. शान चित्रपटातील सशक्त पात्राने कुलभूषण खरबंदा यांच्या स्टारडमला नवीन उंचीवर नेले.
यानंतर बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत कुलभूषण खरबंदा यांचे नाव समाविष्ट झाले आहे. कुलभूषण खरबंदा यांनी त्यांच्या कारकिर्दीला नाट्य कलाकार म्हणून सुरुवात केली.
कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, त्यामुळे कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यांनी नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. एवढेच नाही तर कुलभूषण खरबंदा यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करून मित्रांसोबत थिएटर सुरू केले.
कुलभूषण यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
कुलभूषण अनेक चित्रपटांमध्ये साईड रोलमध्येही दिसले आहेत, मात्र यामध्येही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जो जीता वही सिकंदर या चित्रपटात कुलभूषण आमिर खानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते.