मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी आता विवाहबंधनात अडकला आहे. 20 फेब्रुवारीला अनमोलने कृशा शाहसोबत वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबानी कुटुंब त्यांचे वैयक्तिक आयुष्य कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्यास प्राधान्य देत असल्याने, आतापर्यंत अनमोलबद्दल काही गोष्टी समोर आलेल्या नाहीत. अनमोल काय करतो आणि त्याचं व्यक्तिमत्त्व कसं आहे याबाबत जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.


अनमोलचा जन्म 12 डिसेंबर 1991 रोजी झाला. मुंबई कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून त्यांने दहावीपर्यंत शिक्षण घेतले.


यानंतर तो यूकेमधील सेव्हन ओक्स स्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी गेला.अनमोलने वॉर्विक बिझनेस स्कूल, यूके येथून बीएससी मॅनेजमेंट केले. त्याने काही महिने रिलायन्स म्युच्युअल फंड (RMF) मध्ये इंटर्नशिपही केली. यावेळी तो फंड हाऊसच्या रिसर्च टीमसोबत काम करत होता.


अनमोल अंबानी हा अनिल आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. अनमोल अंबानी यांना ऑगस्ट 2016 मध्ये रिलायन्स कॅपिटलच्या संचालक मंडळात एडिशनल डायरेक्टरम्हणून समाविष्ट करण्यात आलं, तेव्हा तो फक्त 24 वर्षांचा होता.


या वयात अनमोलने आर्थिक सेवा व्यवसायातील कंपनीत काही काळ काम केलं. ही कंपनी आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) शी संबंधित आहे.


वडिलांच्या बिझनेससाठी उत्तम काम केल्याने आपली ओळख बनवण्यात तो यशस्वी ठरला. अनमोलसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ' त्याच्यासोबत अंबानी कुटुंबाचं नाव जोडलं गेलं आहे आणि तो कंपनीचा डायरेक्टर आहे.


पण त्यांच्यासोबत बोलणं अगदी सोपं आहे, कारण तो सगळ्यांसोबत मिळून आनंदाने काम करतो.'