मुंबई : सध्या सोशल मिडीयावर आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकतीच चित्रपटाची तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि ती लोकांच्या पसंतीत उतरलीत. आज चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरमध्ये खूप इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीचीही किनार आहे. हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणा पासून वंचित मुलांवर भाष्य करतो. एकूणच हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. ट्रेलरमध्ये लहानग्यांची शिक्षणासाठीची धड़पड़ लक्ष वेधून घेते. दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे की हया भटक्या, अनाथ मूलांची व्यथा सर्वाना समोर यावी आणि यावर प्रबोधन होऊनी मुलांना योग्य ते शिक्षण मिळावं.


अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी' चित्रपटाचं दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केलं आहे . 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत हा सिनेमा आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यानि दिलं असून डीओपी फारूक खान आहेत . या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.



चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहूण्या भूमिकेत आहेत. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित, अवंतिका  दत्तात्रय पाटील आणि विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत असून म्यूझिक व्हिडीओ पॅलेसवर उपलब्ध आहे.