मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या मॅचो स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. कलाकार अनेकदा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि चित्रपट कलाकारांसोबत मस्ती करताना दिसतात. सध्या अर्जुन कपूर तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानीसोबत त्याच्या आगामी 'एक व्हिलन 2' या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अशा परिस्थितीत हे स्टार्स नुकतंच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये स्पॉट झाले. येथून अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन कपूर तारा सुतारियासोबत मस्ती करू लागला
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर तारा सुतारियाला चिडवताना दिसत आहे. तारा  स्वत:ला वाचवताना दिसत असली तरी.  यावेळी तारा सुतारियाने खूपच लहान ड्रेस परिधान केला होता. अशा परिस्थितीत अर्जुन जेव्हा तिच्यासोबत पापाराझींसमोर मस्करी करत असतो तेव्हा तिला थोडं अस्वस्थ फिल होतं. मात्र, त्यानंतर परिस्थिती हाताळत तिने अर्जुन कपूरसोबत पापाराझींसमोर पोज दिली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अशा मिळत आहेत प्रतिक्रिया 
तारा सुतारिया आणि अर्जुन कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटिझन्स हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत आणि या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. अर्जुन आणि ताराची ही केमिस्ट्री सर्वच चाहत्यांना आवडली आहे अर्जुन कपूरने तारा सुतारियासोबत अशी जबरदस्ती केली नसावी असं काहींचं म्हणणं आहे.