Seema Sajdeh And Sohail Khan: सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि सीमा सजदेह यांच्या 24 वर्षांच्या संसार अचानक मोडला. सोहेल आणि सीमाने घटस्फोटसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु आहे. अशात सोहेलचा मुलगा अचानक आईवर वैतागल्याची बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, OTT प्लॅटफॉर्म Netflix च्या Fabulous Lives of Bollywood Wives या मूळ शोचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. सीझन 2 मध्ये सीमा सजदेह घराबाहेरील नावाची पाटी काढताना दाखवली आहे. सीमा सजदेह यांनी 'खान' लिहिलेले आडनाव काढून नवीन नेमप्लेट लावताना दिसली.  (seema sajdeh son got angry with mom for removing khan surname)


आईवर वैतागला मुलगा


मात्र, त्यांचा मुलगा निर्वाण खान याने सीमा यांच्या या निर्णयाला विरोध केला आणि सीमा नेमप्लेट लावू शकली नाही. निर्वाण रागात आईला म्हणाला की, 'आम्ही चार खानांचे कुटुंब आहोत. पण फक्त आडनाव काढून तीन लोकांची नावे लिहून तू प्रत्यक्षात एका व्यक्तीचे नाव काढून टाकत आहेस.


आम्ही अजूनही...


घरावर नेमप्लेट लावण्यास मुलांनी विरोध केला, 'अशाप्रकारची नेमप्लेट लावणं हे अत्यंत अनावश्यक आहे. तसं करण्याची गरज नाही. काय फरक पडतो? शेवटी, तू अजूनही खान आहेस. आम्ही अजूनही खान आहोत.' सीमाने खान हे आडनाव काढल्यामुळे मुलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी आईला आपल्या विरोध दर्शविला. 


अशी असू शकतं नेमप्लेट


तर निर्वाण आईला आपला राग दाखवल्यानंतर नेमप्लेटबद्दल नवीन आयडियाही दिली.  नेमप्लेटवर 'खान आणि सजदेह' लिहिण्याची सूचना निर्वाणने केली आहे. पण सीमाने नेमप्लेटवर कोणतेही आडनाव न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


आता अशी असेल नेमप्लेट


सीमा सजदेह आपल्या मुलाच्या प्रतिक्रियेबद्दल म्हणाल्या, 'आम्ही सर्व एक कुटुंब आहोत हे सत्य बदलणार नाही, परंतु त्याच वेळी निर्वाण, मी जीवनाच्या त्या टप्प्यावर आहे जिथे मला पुढे पाऊल टाकायचे आहे.' तो म्हणाला, 'मी सध्या ना या बाजूचा आहे ना त्या बाजूचा. तुमच्या आणि जोहानच्या नावात आडनाव एकच (खान) राहील, पण माझ्या नावावर खान आडनाव नसणार.' पण आता त्यांचा घरासमोर 'सीमा, निर्वाण, योहान' अशी नेमप्लेट लावण्यात आली आहे.