करण जोहरच्या पार्टीत मद्यधुंद अवस्थेत दिसली सलमान खानची वहिनी; व्हिडिओ व्हायरल
लग्न मोडल्यानंतर अभिनेत्याची पत्नी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते.
मुंबई : सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि सीमा सजदेह यांच्या 24 वर्षांच्या संसार अचानक मोडला होता. सोहेल आणि सीमाने घटस्फोटसाठी अर्ज केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे कपल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. मात्र यावेळी सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेह एका कारणामुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
लग्न मोडल्यानंतर सीमा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अलीकडेच सीमा चित्रपट निर्माता करण जोहरच्या डिनर पार्टीला पोहोचली होती ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सीमा मद्यधुंद अवस्थेत दिसली होती.
या व्हिडिओमध्ये सीमा पापाराझींसाठी पोज देताना दिसली पण यावेळी तिला नीट उभं राहता येत नव्हतं, हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, 'मद्यधुंद आहे' तर दुसऱ्याने लिहिलं, 'खूप नशेत आहे'. सीमा खान एक फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे. अनेकवेळा ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
लग्नाच्या २४ वर्षांनंतर सोहेलपासून घटस्फोट घेतला
फॅशन डिझायनर सीमा सजदेह- सोहेल खान 24 वर्षांनंतर वेगळे झाले आहेत. दोघंही आता स्वतंत्र अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. या जोडप्याला निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. सीमा पंजाबी कुटुंबातील आहे. तिचे वडील अर्जुन सजदेह. सीमाचा भाऊ बंटी सजदेह कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचा संस्थापक आहे.
सोहेल-सीमाने पळून जाऊन लग्न केलं होतं
सोहेल आणि सीमा यांनी 1998 मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. सीमा मूळची दिल्लीची असून फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली. त्यावेळीच, सीमा आणि सोहेलची पहिली भेट झाली. सोहेलच्या म्हणण्यानुसार तो सीमाच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता. लवकरच दोघंही एकमेकांना डेट करू लागले.