कधीही होऊ शकणार नाही आई? `या` लोकप्रिय गायिकेनं सांगितलं कारण
अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लाइव्ह करत ही बातमी दिली आहे.
मुंबई : अमेरिकन गायिका सेलेना गोमेझ (Selena Gomez) खूप लोकप्रिय आहे. सेलेना तिच्या गाण्यांसोबतच तिच्या खासगी आयुष्यासाठीही चर्चेत असते. ती कधीच आई होऊ शकणार नाही असं तिला वाटत असल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे. कधीही मुलाला जन्म देऊ शकणार नाही. ती आजारी असून त्यासाठी घेत असलेल्या औषधांमुळे हे घडत असल्याचे तिनं म्हटलं आहे. सेलेनानं 2020 मध्ये या आजाराचा खुलासा केला होता.
कधीच होऊ शकणार नाही आई
2 वर्षांपूर्वी इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान सेलेनानं खुलासा केला की ती बायपोलर डिसऑर्डरशी (Bipolar Disorder) लढत आहे. हा एक मानसिक आजार आहे. याविषयी सेलेना म्हणाली की, 'गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमधून गेल्यावर मला जाणवलं की मी बायपोलरची शिकार झाली आहे. एकदा मला ते कळले की ते मला त्याची भीती वाटत नाही. मला वाटतं की लोक याला घाबरतात.'
फॉक्स न्यूजनुसार, सेलेनाने अलीकडेच तिच्या भविष्यातील योजनांबद्दल मोकळेपणानं बोलली, 'जेव्हा ती मातृत्वासाठी तयार असेल तेव्हा तिला दुसऱ्या मार्गांनी आई व्हाव लागेल.' (Selena Gomez Feels She Might Not Be Able To Bear Child In Future Due To Her Medications For Bipolar Disorder Know The Detail)
दरम्यान, 2014 मध्ये सेलेनाला lupus मुळे रुग्णालयात त्यानंतर तिची किड्नी ट्रान्सप्लांट करण्यात आली. तिची जिवलग मैत्रीण Francia Raisa नं तिला किडनी दिली. सेलेनानं नुकताच तिच्या जीवणावर आधारीत My Mind & Me ही डॉक्युमेंट्री फिल्म प्रदर्शित झाली आहे. जो तिच्या करिअरमध्ये असलेला चढ-उतारांवर आधारीत आहे. (Selena Gomez My Mind And Me)