मुंबई : सध्याच्या घडीला देशातील एकंदर परिस्थिती पाहता क्षुल्लक कारणांवरुनही मोठा विरोध आणि अशांतता पसरण्याची चिन्हं स्पष्टपे दिसत आहेत. याच परिस्थितीमध्ये सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर शक्य त्या सर्व परिंनी निशाणा साधण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया म्हणू नका किंवा मग आणखी कोणतं माध्यम. अनेक मार्गांनी संघाला लक्ष्य केलं जात आहे. ही बाब हेरत एका अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संघाला चुकीच्या लक्ष्य करणं थांबवावं असं आवाहन मुस्लिम समुदायाला केलं आहे. 


हा अभिनेता म्हणजे स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा कमाल रशिद खान. केआरके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने एक ट्विट करत अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 'मी सर्व मुस्लिम धर्मीयांना एक विनंती करतो की, आरएसएसने मुस्लिमांशी असं केलं, पोलिसांनी मुस्लिमांशी तसं केलं असे मेसेज करत व्हॉट्स अपवर खेळणं थांबवा. तुम्ही मुस्लिमांची मदत करण्याऐवजी त्यांच्साठी परिस्थिती आणखी कठीण करत आहात. समाजातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करा', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. 




वाचा : प्रभासच्या विवाहाविषयी कुटुंबातील व्यक्तीकडून मोठा खुलासा 



केआरकेचं हे ट्विट यावेळी विषयाला अनसरून असून आता यापुढे तो आणखी काही लिहिणार की इतक्यावरच थांबणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान, कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांवर टीकेची झोड उठवणारा आणि बेताल वक्तव्य करणारा केआरके त्याच्या या ट्विटमुळे चर्चेचा विषय ठरत आहे हे मात्र खरं.