मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradip Patavardhan) यांचं 9 ऑगस्टला निधन झालं. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पटवर्धन यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली. रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं. प्रदीप पटवर्धन यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर अनेक जणांनी त्यांच्यासोबतच्या स्मृतींना उजाळा दिला. यासोबतच प्रदीप पटवर्धन यांचा एक व्हीडिओ तुफान व्हायरल झालाय. (senior marathi actor pradeep patwardhan dahi handi celebration old video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हीडिओ दहिहंडीचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हीडिओत प्रदीपजी दहीहंडीच्या गाण्यावर बेभान होऊन नाचतायेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय आणि शेजारीही दिसतायेत. हा व्हीडिओ त्यांच्या मुंबईतील गिरगावमधील घरातला असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हीडिओ जवळपास प्रत्येकाच्या Whtsapp आणि फेसबूक स्टेटसला पाहायला मिळतोय.


प्रदीप पटवर्धन यांची कारकीर्द (Pradip Patawardhan Cine Journey)


मराठी रंगभूमी, चित्रपट, मराठी दुरचित्रवाणी यांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. 'मोरुची मावशी' या नाटकातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर प्रदीप यांच्या 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेने देखील प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलं. एवढंच नाही तर 'महाराष्ट्राची जत्रा' कार्यक्रमातून त्यांनी सर्वांना पोट धरुन हसण्यास भाग पाडले. 


आपल्या कामातून सर्वांना हसवणारे प्रदीप पटवर्धन आता मात्र मनाला चटका लावून गेले आहेत. पण आता ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कलेच्या माध्यमातून मात्र कायम आपल्यासोबत असतील.