राखी सावंतचा खळबळजनक वक्तव्य, लहानपणी `या` वस्तूला समजायची फुगा
बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
मुंबई : बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतीच ती तिचा पती रितेशपासून वेगळी झाली आहे. ज्याची खूप चर्चा आहे. दरम्यान, राखी सावंतने दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. खरंतर, या मुलाखतीत राखी सावंतला रॅपिड फायर सेगमेंट अंतर्गत काही प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरी द्यायची आहेत. अशा परिस्थितीत राखीने या सेगमेंटमध्ये सांगितलं की, लहानपणी ती कंडोमला फुगा समजायची.
वयाच्या 15-16 व्या वर्षी तिने ब्रेस्ट सर्जरी केली होती. या मुलाखतीत राखीला विचारलं की तिचा इंडस्ट्रीतील पहिला सेलिब्रिटी क्रश कोण होता? याला उत्तर देत राखी सावंत म्हणाली की, शाहरुख, सलमान आणि आमिर खान हे तिचे पहिले सेलिब्रिटी क्रश आहेत. राखीने सांगितलं की, तिला सगळेच खान खूप आवडतात.
यानंतर राखीला विचारण्यात आलं की, तिला शारीरिकदृष्ट्या कोणती गोष्ट आठवते. ज्याचा विचार करून ती अजूनही घाबरते? तर यावर उत्तर देत राखीने सांगितलं की, जेव्हा तिने ब्रेस्ट सर्जरी केली तेव्हा ती खूप घाबरली होती. राखीने सांगितलं की, जेव्हा ती 15-16 वर्षांची होती तेव्हा तिची शस्त्रक्रिया झाली.