मुंबई : सेन्सॉर बोर्डानं अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय'वर कात्री चालवली आहे. सिनेमात रणवीर - आलियावर चित्रीत करण्यात आलेल्या १३ सेकंदांच्या किसिंग सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत हे सीन सिनेमातून वगळण्याचे आदेश दिले आहेत. किसिंग सिनव्यतिरिक्त सिनेमात आणखी चार बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानंतर झोया अख्तर दिग्दर्शित सिनेमाला यूए प्रमाणपत्र मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सॉ़र बोर्डाने दिलेल्या निर्देशानुसार, सिनेमात भागीदारांच्या यादीत 'रॉयल स्टॅग ब्रँड' असलेल्या मद्याचे नाव वगळण्यात आले आहे. पहिल्यादांच अशा ब्रँडचे नाव वगळण्यात आले आहे कारण ती मद्याची कंपनी आहे. त्याचप्रमाणे सिनेमात असलेल्या शिवराळ वाक्यांवरही कात्री चालवण्यात आली आहे. याआधी जेम्स बॉन्ड यांच्या 'स्पेक्टर' सिनेमातील किसिंग सिन कापल्यामुळे सेन्सॉर बोर्डाला टीकेचा सामना करावा लागला होता.


९ फेब्रुवारी रोजी 'गली बॉय' सिनेमाचा जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर संपन्न झाला. प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. हा सिनेमा भारतात व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. चाहत्यांनी दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या कामाला विशेष दाद दिली आहे.