मुंबई : CoronaVirus कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याचं लक्षात येताच मोठी हानी टाळण्यासाठी म्हणून भारतातही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवहार ठप्प झाले, अगदी कलाविश्वसुद्धा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊननंतर चं हे एकंदर चित्र समोर आलेलं असतानाच आता मालिका विश्वातील कलाकार हे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत, आपण क्वारंटाईनच्या काळात काय करत आहोत, हे सांगत ही मंडळी अनेकांपर्यंत पोहोतच आहेत. यातच 'झी मराठी'वरील 'माझा होशील ना' या मालिकेतील सईची आई मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 


सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही सईची आई, 'दादागिरी करायची नाही हं', असं म्हणत रागे भरताना दिसत आहे. बरं ती कोणावर रागे भरत आहे माहितीये? नाही... मग पाहा हा व्हिडिओ... 


d


कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि देशहितासाठी आपलं योगदान म्हणून ही सर्व कलाकार मंडळी सध्या आपआपल्या घरी आहेत. पण, यातही त्यांच्यातील कलागुणांचा आणि हाताशी असणाऱ्या माध्यमांचा वापर करत अतिशय प्रभावी अशा शैलीत त्यांनी आता जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. 


कोरोना विषाणूवरील प्रतिबंधात्मक उपायांचं महत्त्वं, घराबाहेर पडल्यानंतर नागरिकांकडून अपेक्षित असणारं सहकार्य आणि समाजात वावरताना जपलं जाणारं भान या सर्वच गोष्टी या एका अतिशय सुरेख व्हिडिओत अधोरेखित करण्यात आल्या आहेत. बरं, यामध्ये मालिकेच्या कथानकाशी जुळणारा अंदाज असल्यामुळे हा मालिकेचाच एक लहानसा भाग असल्याचं भासत आहे.